लेक लाडकी योजना
केंद्र सरकार राज्यातील मुलींसाठी विविध योजनांची सुरुवात करत असते त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच राज्य शासन मुलींसाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात देखील करत असते.
आज आपण २०२३ मधील अर्थसंकल्पामध्ये सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव लेक लाडकी योजना आहे.
आज देखील समाजात मुलींना मुलांपेक्षा कमी महत्व दिले जाते त्यामुळे मुलींची भ्रूणहत्या केली जाते तसेच मुलींच्या शिक्षणाला कमी महत्व दिले जाते व मुलींना कुटुंबाचे ओझे समजले जाते. त्यामुळे राज्यातील मुलींच्या या सर्व समस्यांचा विचार करून समाजात मुलींबद्दल असलेले नकारात्मक विचार बदलून ते सकारात्मक करण्याच्या दृष्टीने तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना शिक्षणासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लेक लाडकी योजना GR खालील दिलेला आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला ९८ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
विशेष सूचना: आम्ही लेक लाडकी योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली |
लाभ | ९८ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य |
उद्देश्य | मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
लेक लाडकी योजनेचा उद्देश्य
Lek Ladki Yojana Maharashtra Purpose
- राज्यातील मुलीचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा उद्देश्य आहे.
- लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- मुलींना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील मुलींचा सर्वागीण विकास करणे.
- मुली शिक्षणासाठी स्वतःच्या पायावर उभे करणे.
- मुलींचे जीवनमान सुधारणे.
- मुलींना समाजात मानाचे स्थान मिळवून देणे.
- मुलींना स्वावलंबी बनविणे.
- समाजात मुलींबद्दल असलेले नकारात्मक विचार बदलून मुलींबद्दल सकारात्मक विचार निर्माण करणे.
- मुलींना आर्थिक दृष्ट्या बळकट करणे हे या योजनेमागचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
- मुलींना आर्थिक सहाय्य करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे तसेच शिक्षणाची आवड निर्माण करणे.
- मुलींना शिक्षणासाठी पैशांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये या उद्देशाने लेक लाडकी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची गरज भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
लेक लाडकी योजनेचे वैशिष्ट्य
- महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली लेक लाडकी योजना एक महत्वाची अशी एक योजना आहे.
- राज्यातील मुलींच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी लेक लाडकी योजना महत्वपूर्ण ठरेल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींची सामाजिक तसेच आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होईल.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून मुलींना कर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
- या योजनेअंतर्गत मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास तसेच तो उंचावण्यास मदत होईल.
- या योजनेच्या सहाय्याने आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला मुलीच्या शिक्षणाचा, पालनपोषणाचा आणि इतर खर्च करणे सोपे होणार आहे
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी हि योजना महत्वाची ठरणार आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आली आहे जेणेकरून अर्जदार पालकांना अर्ज करण्यासाठी कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
टप्पा | रक्कम |
मुलीच्या जन्मानंतर | ५०००/- रुपये |
मुलगी इयत्ता १ली मध्ये गेल्यावर | ४०००/- रुपये |
मुलगी ६वी मध्ये गेल्यावर | ६०००/- रुपये |
मुलगी ११वी मध्ये गेल्यावर | ८०००/- रुपये |
मुलगी १८ वर्षाची झाल्यावर | ७५०००/- रुपये |
लेक लाडकी योजनेचे लाभार्थी
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील (पिवळा व केशरी रेशनकार्ड धारक) मुली लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
लेक लाडकी योजनेचे लाभ
- लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या सर्व मुलींना ९८ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते जेणेकरून मुली आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
- या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व त्यांना शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- राज्यातील मुली या योजनेच्या सहाय्याने सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- राज्यातील मुलींचे जीवनमान सुधारेल.
- मुली स्वावलंबी बनतील
- मुली शिक्षणासाठी स्वतःच्या पायावर उभ्या राहतील
- राज्यात भ्रूणहत्या थांबेल.
- समाजात मुलींबद्दल असलेले नाकारात्म विचार बदलतील व मुलींबद्दल सकारात्मक विचार निर्माण होईल.
- मुलींचा आत्मविश्वास वाढेल.
- मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल.
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजनेच्या अटी व शर्ती
- फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच लेक लाडकी योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- अर्जदार मुलीचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
- फक्त मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- पांढरे रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार मुलीला स्वतःच्या बँक खात्याचा तपशील देणे आवश्यक आहे तसेच कुटुंबातील इतर कोणाच्या बँक खात्याचा तपशील मान्य नसेल.
- अर्जदार मुलीचे आई किंवा वडील किंवा कुटुंबातील इतर कोणी सदस्य सरकारी सेवेत कार्यरत असता कामा नये.
- अर्जदार मुलीने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल किंवा घेत असेल तर अशा परिस्थितीत त्या मुलीला लेक लाडकी योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जात खोटी माहिती भरून मुलगी लाभ मिळवत असेल आणि हि बाब शासनाच्या लक्षात आल्यास अशा मुलीला या योजनेमधून रद्द केले जाईल व कुटुंबाकडून लाभाची रक्कम वसूल करण्यात येईल.
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- मुलीचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मुलीचे बॅक खाते पासबुक परंतु मुलीचे बँक खाते नसल्यास अशा परिस्थितीत तिच्या आईवडिलांचे बँक खात्याचा तपशील
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- जन्म प्रमाण पत्र
लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- दोन वेळा अर्ज केल्यास एक अर्ज रद्द केला जाईल.
- कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी कार्यालयात कार्यरत असल्यास
- कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसल्यास
- अर्जदार मुलीचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब नसल्यास
- मुलगी या आधी केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेचा लाभ मिळवत असल्यास अशा परिस्थितीत अर्ज रद्द केला जाईल.
लेक लाडकी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
पहिले चरण
- अर्जदारास सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर Registration वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक रेजिस्ट्रेशन पेज उघडेल त्यामध्ये तुंम्हाला तुमचा मोबाईल नंबर तसेच पासवर्ड टाकून रेजिस्ट्रेशन करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसरे चरण
- होम पेज वर लेक लाडकी योजनेवर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर लेक लाडकी योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला विचारलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर तुम्हाला Save बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
असेच नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी
आताच आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
📲आपल्या मोबाईल वर मोफत डिजिटल सेवा अपडेट्स पुरवणारे
जनता/ सदगुरू डिजिटल महा ई सेवा केंद्र ' नक्की जॉईन करा.
👉 आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र
लेक लाडकी योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
लेक लाडकी योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
लेक लाडकी योजनेचा उद्देश्य काय आहे?
राज्यातील मुलींना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
लेक लाडकी योजनेचा लाभ काय आहे?
लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थी मुलीला ९८ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.
लेक लाडकी योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
महाराष्ट्र राज्यातील पिवळे तसेच केशरी रेशनकार्ड धारक आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील सर्व मुली
आशा करतो कि आपल्याला लेक लाडकी योजनेची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले लेक लाडकी योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
0 Comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.