CSC ID:251635150017 Shirish Mhasku Domale
महाराष्ट्र शासन राज्यातील युवकांच्या भविष्यासाठी विविध सरकारी योजना सुरु करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Annasaheb Patil Karj Yojana आहे.
भारत हा एक जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे तसेच एकूण लोकसंख्येच्या ५४ टक्के लोकसंख्या हि वय वर्षे २५ च्या आतील आहे.म्हणून या तरुण वर्गास कुशल बनविणे,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुशल मनुष्यबळाची गरज भागविणे व या उत्पादनक्षमता वयोगटातील उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार करण्यास सक्षम करून त्यांचे जिवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य्य पुरविण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित कुशल तरुणांना स्वतःचा नवीन उद्योग सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी १० ते ५० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.राज्यातील
बेरोजगारी बघता मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे,त्यांना
व्यवसायामध्ये उभारी घेता यावी,व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास व्हावा यासाठी आण्णासाहेब
पाटील कर्जयोजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत
सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते. यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
अधिक माहितीसाठी
कोणीही डाटा कॉपी करू नये अन्यथा कॉपी केस न सांगता होईल .
0 Comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.