Janata Digital News

सदगुरु एंटरप्राईज :- महा ई सेवा सर्व्हिसेस,आपले सरकार सेवा सर्व्हिसेस, सर्व सरकारी व शासकीय योजना फॉर्म , आधारकार्ड दुरुस्ती केंद्र शिक्रापूर मलठण फाटा Mo:8208814042, 8411854305

Followers

घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला ८०% अनुदान. या स्टेप फॉलो करा आणि अर्ज करा.

 


 


Solar Rooftop Online Application सौरउर्जा हा ऊर्जेचा अपारंपारीक स्त्रोत आहे. म्हणजेच, सुर्यापासून मिळणारी ऊर्जा ही कधीही न संपाणारी ऊर्जा आहे. सरकार अशा प्रकारच्या ऊर्जेच्या स्त्रोतांना पाठींबा देते. कारण, उर्जेचे इतर स्त्रोत हे कधी ना कधी संपुष्ठामध्ये येणार आहे. परंतु, सौरऊर्जेवर चालणारे Solar Panel हे खर्चिक असतात. त्यामुळे सामान्य माणूस ते खरेदी करण्याचा विचार करत नाही. ही बाब विचारात घेऊन सरकार solar rooftop subsidy म्हणजेच सोलर पॅनेलवर अनुदान देउ करत आहे. ही सर्व प्रक्रीया ऑनलाईन असेल. तरी या लेखात आपण Solar Rooftop Online Application बद्दल माहिती घेणार आहोत.






घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लॅन्टची गरज आहे? 

तुमचा महीण्याचा वापर किती आहे यावर तुम्हाला किती किलोवॅटचा solar plant for home लागेल हे अवलंबून आहे. उदा. जर तुम्हाला महीण्याला १,००० बील येत असेल तर तुम्हाला १ किलोवॅटचा solar plant for home लागेल आणि जर ५००० बील येत असेल तर ५ किलोवॅट.



सोलर प्लॅन्ट लावण्यासाठी सरकार खरच अनुदान देते का?

याच उत्तर हो असेच आहे. कारण केंद्र तसेच राज्य सरकार यासाठी अनुदान देत असते. याचे मुख्य कारण म्हणजे सरकार स्वत: सौर उर्जेला प्रोस्ताहन देत असते. त्यासाठी विशेष निधीची सुविधा वार्षीक बजेटमध्ये केलेली आहे. solar rooftop for home म्हणजेच घरावर solar panel system लावणे हे खर्चिक बाब आहे त्यामुळे सरकार यासाठी अनुदान देत असते. आता बघूया केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यासाठी किती अनुदान देते.




solar rooftop subsidy साठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार चा वाटा किती


केंद्र सरकार solar rooftop for home यासाठी 4०% अनुदान देत आहे. तसचे राज्य सरकार देखील यासाठी ४०% अनुदान देत आहे. म्हणजेच तुम्हाला जवळ जवळ ८०% अनुदान मिळेल. (Solar Roof Top Scheme) त्याचप्रमाणे दर वर्षी या अनुदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल अशी योजना केंद्र तसेच राज्य सरकारची असेल.

Solar Rooftop Online Application कसे करावे याची माहिती घेऊ.

पुढे केंद्र सरकारच्या Solar Rooftop Online Application पोर्टची लिंक दिली आहे. त्यावर प्रथम क्लिक करून फॉर्म भरवायाचा आहे. तो भरण्याआधी काही सुचनांचे पालन करणे महत्वाचे आहे.

लिंक – 


ऑनलाईन अर्ज करावयाच्या सहा स्टेप्स आहेत.

पहीली स्टेप-

  • केंद्र सरकारचा हा App डाऊनलोड करा.




  • ॲप ओपन करून दिलेले पर्याय बघा. सुरवातीला तुमचे राज्य निवडा.
  • तुमच्या ऐरीयामधील वीज वितरक कंपनी निवडा.
  • नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.

दुसरी स्टेप-

  • नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकूण लॉग इन करा.
  • Solar Rooftop Online Application हा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.

तीसरी स्टेप-

  • DISCOM कडून तुमच्या अर्जाला मंजूरी मिळे पर्यंत थांबायचे आहे. तुमच्या अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर DISCOM कडील नोंदणीकृत विक्रेत्यांकडून Solar Rooftop Plant बसवून घ्यावयाचा आहे.

चौथी स्टेप-

  • Solar Rooftop Plant बसवून घेतल्यानंतर प्लॉन्टची माहिती ऑनलाईन भरण्याचा ऑपशन आहे. त्यात विक्रेत्याच्या मदतीने माहिती भरा आणि नेट मिटरसाठी अर्ज करा.

पाचवी स्टेप-

  • नेट मीटर बसविल्यानंतर आणि डिस्कॉमकडून तपासणी केल्यानंतर ते ऑनलाईन पोर्टलद्वारे कमिशनिंग सर्टिफिकेट तयार करतील.

सहावी आणि शेवटची स्टेप-

  • एकदा का तुम्हाला कमिशनिंग सर्टिफिकेट मिळाले त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेल्स आणि एक रद्द केलेला चेक ऑनलाईन अपलोड करावा लागेल. त्यानंतर ३० दिवसांच्या आत तुमच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाईल.

थोडक्यात, तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घ्या. यामुळे तुम्हाला स्वस्तामध्ये वीज मिळेल तसेच वारंवार होणाऱ्या लोडशेडींगपासून मुक्ती मिळेल. Solar Rooftop Online Application करण्यासाठी लागणारी सर्व माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तसेच तुमच्यामनामध्ये अजून काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंटमध्ये लिहा.


 


📲आपल्या मोबाईल वर मोफत  डिजिटल सेवा अपडेट्स पुरवणारे जनता/ सदगुरू डिजिटल महा ई सेवा केंद्र  ' नक्की जॉईन करा 

                             👉  आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र 

 डिजिटल महा ई सेवा केंद्र सर्व अपडेट्स ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी, नक्की फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा. 














0 Comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.