इंडिया जनता न्युज सोबत राहा १ पाऊल पुढे
आपला ऑनलाईन फ्रॉड झाल्यास येथे करा तक्रार
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 : मिळवा 4 लाखांचे अनुदान
जनता कॉम्प्युटर & सदगुरू महा ई सेवा केंद्र शिक्रापुर , मलठाण फाटा श्रीनाथ ऑटो गॅरेज शेजारी मलठण रोड
महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांचा तसेच शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण राज्य शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव विहीर अनुदान योजना आहे. या योजनेला मागेल त्याला विहीर योजना या नावाने देखील ओळखण्यात येते.
राज्यातील बहुतांश शेतकरी पैशाच्या अभावी शेतात विहीर खणण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासनाकडून 4 लाखाचे अनुदान देण्यात येते. जेणेकरून शेतकऱ्यांना पिण्यासाठी तसेच शेती पीक सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकासाठी पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे ते शेती क्षेत्राकडे पाठ फिरवताना दिसत आहॆ. शेती पिकासाठी विहिरींमधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे शेतकरी शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यात विहीर अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय हाती घेतला.
मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचा निर्धार केला आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहीरी खोदणे शक्य आहे.
मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर (ठिबक / तुषार लावून) केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल अशी आशा आहे त्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला विहीर योजना सुरु करण्याचा विचार केला आहे.
वाचकांसाठी महत्वाची सूचना
आम्ही विहीर अनुदान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ मिळवून शेतात सौर कृषी पंपाचा वापर करू शकतील.
योजनेचे नाव | विहीर अनुदान योजना महाराष्ट्र |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषी विभाग |
लाभ | 4 लाख रुपये |
उद्देश्य | शेतकऱ्याचा आर्थिक विकास करणे |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
विहीर अनुदान योजनेचा उद्देश
Vihir Anudan Yojana Purpose
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने विहीर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
- शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
- राज्यातील दारिद्र्य संपविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर अनुदान योजनेच्या सहाय्याने विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
- शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे.
- विहीर अनुदान योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये तसेच पाण्याच्या चिंतेपासून मुक्तता करणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहॆ.
- आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकयांना शेतात विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून व्याजाने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.
मागेल त्याला विहीर अनुदान योजनेची वैशिष्ट्ये
Magel Tyala Vihir Anudan Yojana Features
- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे मागेल त्याला विहीर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली हि एक महत्वाची अशी एक योजना आहॆ.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्रासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी एक महत्वाचे असे पाऊल मानले जाते आहॆ.
- विहीर अनुदान योजनेला मागेल त्याला विहीर अनुदान योजना या नावाने देखील ओळखण्यात येते आहॆ.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे जेणेकरून अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकेल व त्याला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
- मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्र शासनाने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींची संख्यांची अट ही रद्द केलेली असून आता जास्तीत जास्त लोकांना मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे
- राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली विहीर अनुदान योजना एक महत्वाची अशी एक योजना आहे.
- या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्यामुळे योजनेत घोटाळा होण्याची शक्यता नसेल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.
विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी
Vihir Anudan Yojana Beneficiary
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी जे स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत असे शेतकरी मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत.
- अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती
- भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती
- इतर मागास वर्गातील शेतकरी
- महिला कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
- जॉब कार्ड धारक व्यक्ती
- जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी
- नीरधीसूचित जमाती
- दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी
- अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी.
- सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
- अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
- शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे.
विहीर अनुदान योजनेचा लाभ
Vihir Anudan Yojana Benefits
- मागेल त्याला विहीर अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे आर्थिक अनुदान देण्यात येते.
- राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- राज्यातील शेतकरी विहीर खोदण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
- या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.
- राज्यातील शेतकरी स्वावलंबी बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहतील.
- राज्यातील शेतकरी शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती व्यवसाय करण्यासाठी आकर्षित होतील.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 4 लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल त्यामुळे शेतकयांना विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनेल तसेच त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.
मागेल त्याला विहीर असून योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान
- विहीर असून योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे असून देण्यात येते.
विहीर अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया
Beneficiary Selection Process under Well Subsidy Scheme
- योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया हि ग्रामसेवक यांच्या मार्फत करण्यात येईल.
- ग्रामसभा / ग्रामपंचायतीच्या मान्यतेनंतर एका महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १५ दिवसाच्या आत तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची राहील.
विहीर अनुदान योजनेअंतर्गत विहिर कोठे खोदावी याबाबत माहिती
- दोन नाल्यांच्या मधिल क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान ३० से.मी. चा थर व किमान ५ मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो तेथे.
- नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.
- जमिनीच्या सखल भागात जेथे किमान ३० से. मी. पर्यंत मातीचा थर व किमान ५ मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो.
- नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण
- माती नसावी.
- घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात .
- नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतांना देखील वाळु, रेती व गारगोट्या थर दिसून येते.
- नदीचे/ नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.
- अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.
विहीर अनुदान योजनेअंतर्गत विहिर कोठे खोदु नये याबाबत माहिती
- भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.
- डोंगराचा कडा व आसपासचे १५० मीटरचे अंतरात.
- मातीचा थर ३० से.मी. पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
- मुरमाची (झिजलेला खडक) खोली ५ मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
- (मुरुमाची खोली सर्वसाधारणपणे अस्तित्वात असलेल्या जवळपासच्या विहिरीत डोकावले असता समजते. आसपास विहीर नसल्यास जवळच्या नदी / नाल्याच्या काठावरुन मुरुमाची खोलीचा अंदाज मिळू शकतो.)
- विहीर खोदतांना खाली काळा खडक / पाषाण लागल्यास मशीन वापरुन पुढील खोदकाम करता येते. मात्र त्याने खर्च वाढतो. म्हणून पुढील खोदकाम न करता त्या विहिरीचे खोदकाम तेथेच बंद करुन पंचनामा करुन पुर्णत्वाचे दाखले द्यावे. तसेच, १४ (क) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोली इतके काम करुनही एखाद्या विहिरीस पाणी लागले नसल्यास तसे नमूद करुन विहिर निष्फळ ठरविण्यात यावी. अशा दोन्ही प्रकारे अपयशी झालेल्या विहिरीत पावसाचे पुरेसे पाणी यावे या करिता, शेतात चर खोदकाम व फार्म बंडिंग करून पाण्याचा निचरा विहीरी समोरच्या recharge pit मध्ये सोडावा. अशाने संपूर्ण पावसाळ्यात एकदा जरी चांगला पाऊस पडला तरी ती विहीर भरून जाईल. तसेच, गरज असल्यास विहिरीच्या खालच्या बाजूला भूमिगत बंधारा बांध जेणेकरुन या विहरीत साचलेले पावसाचे पाणी ३-४ महिने टिकून राहील. त्याचा उपसा करुन संबंधित शेतकऱ्याने संरक्षित सिंचन करावे व आपल्या पिकाची उत्पादकता वाढवून आपले उत्पन्न वाढवावे.
विहीर अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता
Vihir Anudan Yojana Maharashtra Eligibility
- अर्जदार व्यक्ती हि शेतकरी असणे आवश्यक आहॆ तसेच त्याच्याजवळ शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहॆ.
विहीर अनुदान योजनेच्या अटी
Vihir Anudan Yojana 2022 Terms & Condition
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच विहीर अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
- राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार शेतकऱ्याकडे शेती योग्य भूमी असणे गरजेचे आहे.
- शेतात विहीर असता कामा नये.
- अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे व बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने यापूर्वी विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
- लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
- लाभार्थी शेतक-याची जमीन विहीरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. (यासंदर्भात शाखा अभियंता / उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी / कर्मचारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्यांचा अहवाल घेण्यात येईल)
- शेतात ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणपासून 500 मीटर पर्यंत विहीर नसावी.
- दोन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही.
- अर्जदार व्यक्तीच्या 7/12 वर यापूर्वी विहिरीची नोंद नसवी.
- लाभार्थीकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असावा.
- लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेवू शकतात मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र 0.40 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
- जर अर्जदार व्यक्तीच्या जमिनीचे सह हिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
मागेल त्याला विहीर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Magel Tyala Vihir Yojana Maharashtra Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
- जमिनीचे कागदपत्रे ७/१२ व ८अ
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
- सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र
विहीर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
Vihir Anudan Yojana 2023 Application Process
- अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्राम पंचायत कार्यालयात जावे लागेल व ग्राम सेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक अशी कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
- अर्ज पेटी दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल. हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल. याप्रमाणे मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाईन भरल्या जातील ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीसाठी जबाबदार असलेले तांत्रिक सहाय्यकाची राहील. वेळ प्रसंगी तांत्रिक सहाय्यकास सुद्धा ऑनलाईनसाठी डाटा एंट्री करावी लागली तर करतील.
- अशा प्रकारे तुमची विहीर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
विहीर अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
विहीर अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे
विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत
विहीर अनुदान योजनेचा लाभ काय आहे?
विहीर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
विहीर अनुदान योजनेचा उद्देश काय आहे?
आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे
विहीर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
शेतकरी योजनेअंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
विहीर अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यास किती अनुदान दिले जाते?
विहीर अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 4 लाखाचे अनुदान देण्यात येते.
📲आपल्या मोबाईल वर मोफत डिजिटल सेवा अपडेट्स पुरवणारे जनता/ सदगुरू डिजिटल महा ई सेवा केंद्र ' नक्की जॉईन करा
👉 आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र
श्रावणबाळ अनुदान योजना : मिळवा 1500/- रुपये आर्थिक सहाय्य
सदगुरु एंटरप्राईज महा ई सेवा केंद्र शिक्रापूर मलठण फाटा
महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Shravan Bal Yojana आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गरजू, गरीब, आर्थिक दृष्ट्या कमजोर, निराधार वृद्ध व्यक्तींना ज्यांचे वय 65 वर्ष व 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा जेष्ठ नागरिकांना महाराष्ट शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेअंतर्गत आर्थिक सहायता केली जाते.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अथवा नाव नसलेल्या 65 वर्ष व 65 वर्षावरील जेष्ठ निराधार स्त्री पुरुषांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्टीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून प्रत्येक महिन्याला 1500/- रुपयांची आर्थिक सहायता करण्यात येते.
या योजनेस पूरक असलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजने मधून प्रतिमहिना 1500/- रुपये रक्कम निवृत्तीवेतन अनुदान देण्यात येते म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभार्थी जेष्ठ नागरिकास प्रतिमाह 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य दिले जाते.
महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आर्थिक प्रोत्साहन देऊन या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य करणे आणि त्यांचे हाल कमी करून त्यांना आर्थिक सहाय्य्य करून त्यांना आर्थिक स्थेर्य प्राप्त करून देण्याचे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट्य आहे.
वाचकांना विनंती
आम्ही श्रावणबाळ अनुदान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी व्यक्ती असतील जे श्रावणबाळ अनुदान योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव | Shravan Bal Yojana |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक |
लाभ | प्रतिमहिने 1500/- रुपये आर्थिक सहायत्ता |
योजनेची सुरुवात | 2016 |
योजनेचे उद्दिष्ट्य | राज्यतील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य्यता करणे |
या योजनेअंतर्गत गट अ आणि गट ब असे दोन गट करण्यात आले आहेत
Shravan Bal Anudan Yojana
गट अ – दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या जेष्ठ स्त्री व पुरुषांना या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.
गट ब – दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव नसलेल्या जेष्ठ स्त्री व पुरुषांना या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेचा उद्देश्य
Shravan Bal Yojana Purpose
- महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात आर्थिक सहाय्य्य करणे जेणेकरून त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये हा उद्देश्य समोर ठेवून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील वृद्ध नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- वृद्ध नागरिकांचा आर्थिक विकास करणे.
- वृद्ध नागरिकांचे त्यांच्या वृद्धपकाळात जीवनमान सुधारणे.
- वृद्ध नागरिकांचा सामाजिक विकास करणे
- वृद्ध नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी श्रावणबाळ योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब वृद्ध नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
- श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहेत त्यामुळे अर्जदार आपल्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराला शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार आणि ज्यामुळे अर्जदाराचे पैसे आणि वेळेची बचत होईल.
- श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे लाभार्थ्यास त्याच्या वृद्धपकाळात दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी
Shravan Bal Yojana Maharashtra Beneficiary
- महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारे फायदे
Shravan Bal Yojana Benefits
- श्रावण बाळ योजनेनंतर्गत लाभार्थ्यास राज्य शासनाद्वारे दरमहा 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते जेणेकरून वृद्ध व्यक्ती आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.
- या योजनेमुळे महाराष्ट्रातील वृद्ध नागरिक आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील
- या योजनेमुळे महाराष्ट्रातील वृद्ध नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागणार नाही.
- या योजनेमुळे जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक समस्येवर मात करतील.
- वृद्ध नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
- वृद्ध नागरिक सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- वृद्ध नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
श्रावणबाळ अनुदान योजनेची पात्रता
Shravan Bal Yojana Eligibility
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
श्रावण बाळ योजनेच्या अटी
Shravan Bal Yojana Terms & Condition
- श्रावण बाळ योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच घेता येईल.
- श्रावण बाळ योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्ती 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करत असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 65 वर्ष व 65 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
- लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे
- लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- पेक्षा जास्त नसावे.
- बीपीएल (BPL) श्रेणीत नसलेल्या जेष्ठ नागरिकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो.
- या योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांनाच घेता येणार आहे.
- महाराष्ट्र राज्याचं बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत पेंशन योजनेचा लाभ घेत असल्यास अशा अर्जदाराचा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील कोण सदस्य जर सरकारी कर्मचारी असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजेसाठी आवश्यक कागदपत्रे
Shravan Bal Yojana Documents
- लाभार्थी व्यक्तीचा वयाचा दाखला (जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड)
- महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष वास्तव्याचा दाखला (डोमेसाइल प्रमाणपत्र/ग्रामपंचायत/नगरसेवक दाखला)
- उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 21,000/- पेक्षा जास्त नसावे)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पिवळे (BPL) रेशन कार्ड
- घरपट्टी पावती
- विजेचे बिल
- दारिद्र रेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्र
- मतदान कार्ड
- मोबाईल नंबर
श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
Maharashtra Shravan Bal Yojana
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार व्यक्तीचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार व्यक्तीने अर्जात खोटी किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत दरमहा अनुदान प्राप्त करत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- एकावेळी एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास बाकीचे अर्ज रद्द केले जातील.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000/- पेक्षा जास्त असल्यास
- ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत अर्जदाराचे नाव समाविष्ट नसल्यास
श्रावणबाळ योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
Shravan Bal Yojana Offline Registration Process
या योजनेच्या अधिक माहितीसाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालय/तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा व सादर योजनेअंतर्गत अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली माहिती भरून योग्य ती कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी सोबत जोडून अर्ज सादर करावा व अर्ज भरल्याची पोच पावती संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावी.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
Shravan Bal Yojana Online Registration Process
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर वर New User & Register Here वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला OPTION १ आणि OPTION २ दिसतील तुम्ही ह्या दोन OPTION पैकी कोणत्याही OPTION ने अर्ज करू शकता.
OPTION १ चा पर्याय निवडल्यास: OPTION १ पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल मग तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल OTP टाकल्यानंतर तुम्हाला User Id आणि Password बनवता येईल
User Id आणि Password बनवल्यानंतर तुम्हाला Login करून या योजने अंतर्गत विचारलेली तुमची सर्व माहिती (Photo,Identy Proof,Address Proof,Bank Account,IFSC Code,Email इत्यादी) भरावी लागेल.
OPTION 2 चा पर्याय निवडल्यास: OPTION १ पर्याय निवडल्यास तुम्हाला या योजने अंतर्गत विचारलेली तुमची सर्व माहिती (Photo,Identy Proof,Address Proof,Bank Account,IFSC Code,Email इत्यादी) भरावी लागेल नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल मग तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल OTP टाकल्यानंतर तुम्हाला User Id आणि Password बनवता येईल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत व सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत केलेल्या अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया
Shravan Bal Yojana Status
- सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- तुमच्या समोर जे होमपेज ओपन होईल त्याच्यावर Track Your Application वर क्लिक करावे लागेल.
- तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकून Go वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्यासमोर दिसेल.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया
Shravan Bal Yojana Beneficiary List
- सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होमपेज ओपन होईल त्याच्यावर असलेल्या लाभार्थी यादी वर क्लिक करावे.
- आता तुम्हाला तुमचा जिल्हा/गाव/ब्लॉक निवडावे लागेल व सबमिट वर क्लिक करावे लागेल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर उपलब्ध होईल.
अधिकृत वेबसाईट | Click Here |
टोल फ्री क्रमांक | 1800-120-8040 |
Digital Visit Card | Maha E Seva |
Join Whatsapp Channel | Click Here |
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेअंतर्गत वयोमर्यादा काय आहे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 65 वर्षे पूर्ण असणे आवश्यक.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यास किती लाभ दिला जातो?
या योजनेअंतर लाभार्थ्यास महिना 600/- रुपये अनुदान दिले जाते.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेच्या माहितीसाठी टोल फ्री क्रमांक काय आहे?
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेच्या माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १८००-१२०-८०४० आहे
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना कोणासाठी आहे?
ही योजना महाराष्ट्र राज्यातील 65 व 65 वर्षाच्या वरील जेष्ठ नागरिकांसाठी आहे.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेचे उद्दीष्ट्य काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील गरीब,निराधार,आर्थिक दृष्ट्या कमकुवत जेष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य करण्याचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
सारांश:
आशा करतो कि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.