Janata Digital News

सदगुरु एंटरप्राईज :- महा ई सेवा सर्व्हिसेस,आपले सरकार सेवा सर्व्हिसेस, सर्व सरकारी व शासकीय योजना फॉर्म , आधारकार्ड दुरुस्ती केंद्र शिक्रापूर मलठण फाटा Mo:8208814042, 8411854305

Followers

  • This is Slide 1 Title

    This is slide 1 description. Go to Edit HTML and replace these sentences with your own words. This is a Blogger template by Lasantha - PremiumBloggerTemplates.com...

  • This is Slide 2 Title

    This is slide 2 description. Go to Edit HTML and replace these sentences with your own words. This is a Blogger template by Lasantha - PremiumBloggerTemplates.com...

  • This is Slide 3 Title

    This is slide 3 description. Go to Edit HTML and replace these sentences with your own words. This is a Blogger template by Lasantha - PremiumBloggerTemplates.com...

Showing posts with label pm vishvakarma yojana. Show all posts
Showing posts with label pm vishvakarma yojana. Show all posts

भाडे करार (निवासी) म्हणजे काय ?




भाडे करार (निवासी) म्हणजे भाडेकरार हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एका पक्षाने (भाडेकरू) दुसऱ्या पक्षाशी (मालक) करार केला आहे की, ठराविक मुदतीसाठी आणि ठराविक भाड्याने मालकाच्या मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये राहण्यासाठी.

पीएम विश्वकर्मा योजना

या करारामध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतात:

  1. मालक आणि भाडेकरूंची माहिती: दोन्ही पक्षांचे नाव, पत्ता आणि संपर्क माहिती.
  2. प्रॉपर्टीचे वर्णन: प्रॉपर्टीचे पूर्ण पत्ता आणि तपशील.
  3. भाड्याची रक्कम: मासिक भाडे, भरण्याची पद्धत आणि तारीख.
  4. कराराची मुदत: करार किती दिवस, महिने किंवा वर्षांसाठी असेल.
  5. डिपॉझिट: प्रॉपर्टीच्या सुरक्षा रक्कम (सिक्युरिटी डिपॉझिट) आणि ती परत कशी केली जाईल.
  6. इतर अटी आणि शर्ती: मालमत्तेच्या वापराच्या अटी, देखभाल आणि दुरुस्तीचे जबाबदारी, वीज, पाणी, इ.चे बिल भरायची जबाबदारी, आणि मालमत्तेच्या वापराशी संबंधित इतर अटी.

हा करार दोन्ही पक्षांना सुरक्षा आणि स्पष्टता देण्यासाठी महत्वाचा असतो, कारण यामुळे संभाव्य विवाद टाळले जाऊ शकतात.

भाडेकरार करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता.






शिलाई मशीन योजना 2024


नमस्कार माता / भगीनिनो, शिलाई मशीन योजना महाराष्ट्र ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरी बसून स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी राबवण्यात येणारी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन मोफत पुरवण्यात येते. 

या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील महिलांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे आणि त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. ज्यामुळे त्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील.



शिलाई मशीन योजना लाभार्थी महिला शिलाई मशीनच्या सहाय्याने परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून पैसे कमवू शकतील. यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. राज्यातील 5 हजारांपेक्षा जास्त गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचा राज्य शासनाचा हेतू आहे.

वाचा :- गाडी नंबर वरून ओरिजनल गाडी RC 

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असल्यामुळे महिलांना दैनंदिन गरजांसाठी पैशासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. रोजगाराच्या स्थायी संधी उपलब्ध नसल्यामुळे महिलांना रोजगार मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि कुटुंबाची गरज पूर्ण करणे शक्य होत नाही.

शिलाई मशीनची किंमत जास्त असल्यामुळे त्या खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते. 

 

शिलाई मशीन योजना महाराष्ट्रचे उद्दिष्ट

  • महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील महिलांना घरबसल्या स्वयंरोजगार मिळवून देणे.
  • महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
  • महिलांचे सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
  • महिलांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांचे जीवनस्तर सुधारणे.
  • महिलांना कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज न पडणे.
  • महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी कर्ज घेण्याची गरज न पडणे.
  • गरीब कुटुंबातील आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
  • महिलांचे भविष्य उज्ज्वल बनवणे.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
  • बेरोजगार महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
  • राज्याचा आर्थिक विकासाला चालना देणे.
  • महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

 

श्री स्टुडिओ लेडिज कलेक्शन 
आमच्या येथे अरी वर्क क्लासेस घेतले जातात , तसेच ऑर्डर नुसार ब्लाऊज डिझाईन करून मिळेल. अधिक माहितीसाठी मो : 8380074558 / 9309273165 

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र लाभार्थी  

  • महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू महिला.
  • राज्यातील 50 हजारांपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्याचे लक्ष्य.

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र फायदे  

  1. गरीब कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी कर्ज घेण्याची गरज नाही.
  2. महिलांना स्वतःचा रोजगार सुरु करून आर्थिक उत्पन्न वाढवता येईलकुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत.
  3. महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत.

सामाजिक लाभ शिलाई मशीन योजना महाराष्ट्र

  • महिला स्वावलंबी बनतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत.
  • महिलांचा सामाजिक आणि आर्थिक विकास.
  • महिला सशक्त आणि आत्मनिर्भर बनतील.
  • महिलांचे भविष्य उज्ज्वल होईल.
  • महिलांचा आत्मविश्वास वाढेल.


शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक पात्रता

  • महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला 18 ते 42 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला शिलाई कामात (Silai Machine Yojana Maharashtra) कुशल असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेने शिलाई प्रशिक्षण घेतलेले असल्यास प्राधान्य दिले जाईल.
  • अर्जदार महिलेने पूर्वी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.


शिलाई मशीन योजना महाराष्ट्र कागदपत्राची यादी 

  • आधार कार्ड - मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक.
  • रेशन कार्ड - ऑनलाईन असणे आवश्यक 
  • रहिवाशी पुरावा (जसे की वीजबिल, मतदान ओळखपत्र)
  • विजेचे बिल - 3 महिने जुने नको.
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो -3 

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज पद्धत 

  1. जनता सदगुरू कॉम्प्युटर आणि महा ई सेवा केंद्र शिक्रापूर श्री स्टुडिओ लेडीज शॉपी समोर शिवचंद्र कॉम्प्लेक्स शॉप नंबर 2 वेदांत ऑटो गॅरेज शेजारी महात्मा ज्योतिबा फुले चौक मलठण फाटा येथे फॉर्म भरून मिळेल.
अर्ज सुरू - 10 जून 2024 
अर्ज शेवट - अजून तारीख आलेली नाही 
फॉर्म फी - 400 रुपये 

अर्ज भरताना व्यक्ती स्वतः उपस्थित असणे आवश्यक. 

अशाच महत्वपूर्ण सरकारी योजना संबंधित माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर कृपया तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

 


  

असेच नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आताच आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

📲आपल्या मोबाईल वर मोफत  डिजिटल सेवा अपडेट्स पुरवणारे

 जनता/ सदगुरू डिजिटल महा ई सेवा केंद्र  ' नक्की जॉईन करा. 

     👉  आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र 

 डिजिटल महा ई सेवा केंद्र सर्व अपडेट्स ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नक्की फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा 
   








पीएम विश्वकर्मा योजना फॉर्म भरून मिळेल.

 


नमस्कार मित्रांनो , आज आपण PM Vishwakarma Yojana Maharashtra 2024 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे ही योजना. या योजनेअंतर्गत १ लाख रू. कर्ज मिळणार तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. 




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 77 व्या झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये PM Vishwakarma Yojana Maharashtra या योजनेची घोषणा केली. देशातील कारागीर शिल्पकार तसेच इतर पात्र नागरिकांसाठी यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. आता या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची देखील मान्यता मिळालेली आहे. या योजनेचे पहिल्या टप्प्यातील बजेट 12000 करोड ते 14000 रुपये करोड इतके आहे. 


PM Vishwakarma Yojana Maharashtra 2024

कारागिर शिल्पकारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केली जातील.

कुशल तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासह विद्यावेतन दिले जाईल.

सवलतीच्या व्याजदर आणि दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे.

प्रशिक्षितांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र प्रदान करणे.

लोहार, कुंभार, चांभार, धोबी, गवळी, माळी समाजाला याचा फायदा होईल.

 


विश्वकर्मा योजना योजनेचे उद्दिष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील  मंत्रिमंडळ समितीने आज 13,000 कोटी रुपये खर्चाच्या “पीएम विश्वकर्मा” या  नवीन केंद्र सरकारी  योजनेला, पाच वर्षांच्या कालावधीसाठी (आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28) मंजुरी दिली. हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्त-कलाकार  आणि कारागिरांची गुरु-शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हस्त-कलाकार  आणि कारागीरांच्या कामाचा दर्जा सुधारणे तसेच त्यांची उत्पादने आणि सेवा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवून, विश्वकर्मा, स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडले जातील, हे सुनिश्चित करणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे. दरवर्षी सुमारे पंधरा हजार नोकऱ्या उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आर्थिक वृद्धी आणि स्थिरता आणणे हा यामागचा हेतू आहे. रोजगार निर्मिती करणे याकडे ही योजना प्रोत्साहित करते.

Vishwakarma Yojana Maharashtra कर्जाचे टप्पे

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, हस्त-कलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल, तसेच 5% सवलतीच्या व्याज दराने पहिल्या टप्प्यात रु. 1 लाखपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात रु. 2 लाखपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल. त्याशिवाय, ही योजना कौशल्य श्रेणी सुधारणा, अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य, डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल.  PM Vishwakarma Yojana Maharashtra

PM Vishwakarma Yojana प्रशिक्षण 

काराकारागिरांना प्रशिक्षण देणे हे एक मुख्य उद्दिष्ट या योजनेचे आहे. त्यांना कुशल बनवणे हा त्यामागचा हेतू आहे. हे प्रशिक्षण शिकत असताना त्यांना विद्यावेतन म्हणजेच की stipend दिले जाणार आहे की जे रुपये पाचशे इतके असेल. तसेच प्रगतशील बनण्यासाठी विविध साधनांची खरेदी करण्यासाठी त्यांना रुपये पंधराशे इतकी रक्कम देखील दिली जाणार आहे.


योजनेसाठी कोण पात्र?

ही योजना देशाच्या  ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागिरांना मदत करेल. पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश केला जाईल: (1) सुतार (2) होडी बांधणी कारागीर (3i) चिलखत बनवणारे (4) लोहार (5) हातोडी आणि अवजार संच बनवणारे (6) कुलूप बनवणारे (7) सोनार (8) कुंभार (9) शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट (दगड फोडणारे) (10) चर्मकार (पादत्राणे कारागीर) (11) मेस्त्री (12) टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर (13) बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे (14) न्हावी (केश कर्तनकार) (15) फुलांचे हार बनवणारे कारागीर (16) परीट (धोबी) (17) शिंपी आणि (18) मासेमारचे जाळे विणणारे.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

17 सप्टेंबर हा दिवस विश्वकर्मा जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे 17 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र सरकार ही योजना सुरू करणार आहे. अजून पर्यंत अधिकृत वेब पोर्टल किंवा तपशील वार माहिती केंद्र सरकारकडून प्रसिद्ध केलेली नाही. पुढील माहिती जशी प्रसिद्ध केली जाईल तेव्हा आम्ही देखील तुमच्यासाठी सर्व माहिती नक्कीच घेऊन येऊ. PM Vishwakarma Yojana Maharashtra



मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana Maharashtra 2024) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि उद्दिष्ट , ती योजना म्हणजे काय इत्यादी ,मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !









घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला ८०% अनुदान. या स्टेप फॉलो करा आणि अर्ज करा.

 


 


Solar Rooftop Online Application सौरउर्जा हा ऊर्जेचा अपारंपारीक स्त्रोत आहे. म्हणजेच, सुर्यापासून मिळणारी ऊर्जा ही कधीही न संपाणारी ऊर्जा आहे. सरकार अशा प्रकारच्या ऊर्जेच्या स्त्रोतांना पाठींबा देते. कारण, उर्जेचे इतर स्त्रोत हे कधी ना कधी संपुष्ठामध्ये येणार आहे. परंतु, सौरऊर्जेवर चालणारे Solar Panel हे खर्चिक असतात. त्यामुळे सामान्य माणूस ते खरेदी करण्याचा विचार करत नाही. ही बाब विचारात घेऊन सरकार solar rooftop subsidy म्हणजेच सोलर पॅनेलवर अनुदान देउ करत आहे. ही सर्व प्रक्रीया ऑनलाईन असेल. तरी या लेखात आपण Solar Rooftop Online Application बद्दल माहिती घेणार आहोत.






घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लॅन्टची गरज आहे? 

तुमचा महीण्याचा वापर किती आहे यावर तुम्हाला किती किलोवॅटचा solar plant for home लागेल हे अवलंबून आहे. उदा. जर तुम्हाला महीण्याला १,००० बील येत असेल तर तुम्हाला १ किलोवॅटचा solar plant for home लागेल आणि जर ५००० बील येत असेल तर ५ किलोवॅट.



सोलर प्लॅन्ट लावण्यासाठी सरकार खरच अनुदान देते का?

याच उत्तर हो असेच आहे. कारण केंद्र तसेच राज्य सरकार यासाठी अनुदान देत असते. याचे मुख्य कारण म्हणजे सरकार स्वत: सौर उर्जेला प्रोस्ताहन देत असते. त्यासाठी विशेष निधीची सुविधा वार्षीक बजेटमध्ये केलेली आहे. solar rooftop for home म्हणजेच घरावर solar panel system लावणे हे खर्चिक बाब आहे त्यामुळे सरकार यासाठी अनुदान देत असते. आता बघूया केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यासाठी किती अनुदान देते.




solar rooftop subsidy साठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार चा वाटा किती


केंद्र सरकार solar rooftop for home यासाठी 4०% अनुदान देत आहे. तसचे राज्य सरकार देखील यासाठी ४०% अनुदान देत आहे. म्हणजेच तुम्हाला जवळ जवळ ८०% अनुदान मिळेल. (Solar Roof Top Scheme) त्याचप्रमाणे दर वर्षी या अनुदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल अशी योजना केंद्र तसेच राज्य सरकारची असेल.

Solar Rooftop Online Application कसे करावे याची माहिती घेऊ.

पुढे केंद्र सरकारच्या Solar Rooftop Online Application पोर्टची लिंक दिली आहे. त्यावर प्रथम क्लिक करून फॉर्म भरवायाचा आहे. तो भरण्याआधी काही सुचनांचे पालन करणे महत्वाचे आहे.

लिंक – 


ऑनलाईन अर्ज करावयाच्या सहा स्टेप्स आहेत.

पहीली स्टेप-

  • केंद्र सरकारचा हा App डाऊनलोड करा.




  • ॲप ओपन करून दिलेले पर्याय बघा. सुरवातीला तुमचे राज्य निवडा.
  • तुमच्या ऐरीयामधील वीज वितरक कंपनी निवडा.
  • नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.

दुसरी स्टेप-

  • नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकूण लॉग इन करा.
  • Solar Rooftop Online Application हा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.

तीसरी स्टेप-

  • DISCOM कडून तुमच्या अर्जाला मंजूरी मिळे पर्यंत थांबायचे आहे. तुमच्या अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर DISCOM कडील नोंदणीकृत विक्रेत्यांकडून Solar Rooftop Plant बसवून घ्यावयाचा आहे.

चौथी स्टेप-

  • Solar Rooftop Plant बसवून घेतल्यानंतर प्लॉन्टची माहिती ऑनलाईन भरण्याचा ऑपशन आहे. त्यात विक्रेत्याच्या मदतीने माहिती भरा आणि नेट मिटरसाठी अर्ज करा.

पाचवी स्टेप-

  • नेट मीटर बसविल्यानंतर आणि डिस्कॉमकडून तपासणी केल्यानंतर ते ऑनलाईन पोर्टलद्वारे कमिशनिंग सर्टिफिकेट तयार करतील.

सहावी आणि शेवटची स्टेप-

  • एकदा का तुम्हाला कमिशनिंग सर्टिफिकेट मिळाले त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेची डिटेल्स आणि एक रद्द केलेला चेक ऑनलाईन अपलोड करावा लागेल. त्यानंतर ३० दिवसांच्या आत तुमच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाईल.

थोडक्यात, तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घ्या. यामुळे तुम्हाला स्वस्तामध्ये वीज मिळेल तसेच वारंवार होणाऱ्या लोडशेडींगपासून मुक्ती मिळेल. Solar Rooftop Online Application करण्यासाठी लागणारी सर्व माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तसेच तुमच्यामनामध्ये अजून काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंटमध्ये लिहा.


 


📲आपल्या मोबाईल वर मोफत  डिजिटल सेवा अपडेट्स पुरवणारे जनता/ सदगुरू डिजिटल महा ई सेवा केंद्र  ' नक्की जॉईन करा 

                             👉  आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र 

 डिजिटल महा ई सेवा केंद्र सर्व अपडेट्स ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी, नक्की फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा.