Janata Digital News

सदगुरु एंटरप्राईज :- महा ई सेवा सर्व्हिसेस,आपले सरकार सेवा सर्व्हिसेस, सर्व सरकारी व शासकीय योजना फॉर्म , आधारकार्ड दुरुस्ती केंद्र शिक्रापूर मलठण फाटा Mo:8208814042, 8411854305

Followers

घरकुल योजना


यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मिळणार १ लाख २० हजारापर्यंत अनुदान

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही भटक्या व विमुक्त जाती जमातींच्या लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ देण्यात येणार आहे.

ही योजना इतर मागास बहुजन कल्याण या विभागातर्फे राबविली जाणारी एक योजना आहे. या योजनेचा  मुख्य उद्देश म्हणजेच विमुक्त जाती व भटकत्या जमाती यांना स्वतःचे घर उपलब्ध करून देणे आहे. जर लाभार्थ्याला राहण्यासाठी चांगले घर असेल तर तो योग्य प्रकारचे जीवन जगू शकतो परंतु या जाती-जमातींमध्ये बरेच असे लाभार्थी असते ज्यांना स्वतःचे घर नसते आणि ती स्वतःचे घर बांधण्यासाठी सक्षम नसतात.

मागास समाजाचा विकास करणे हा या योजने मागचा मुख्य उद्देश आहे.

लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज कसा करायचा आणि यासाठी कोणते कागदपत्रे महत्त्वाचे आहे ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. जेणेकरून या योजनेचा लाभ घेताना तुम्हाला काही अडचणी येणार नाही



यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कोणत्या आहे अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा  रहिवासी असायला हवा.

लाभार्थ्याकडे स्वतःचे पक्के मकान नसावे.

यापूर्वी लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

ही योजना एका परिवारातील एकाच व्यक्तीला दिली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच गुंठे जमीन देण्यात येणार आहे आणि 269 चौरस फूट इतक्या जागेमध्ये हे घरकुल देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी फक्त विमुक्त आणि भटक्या प्रवर्गातील लाभार्थीच पात्र ठरणार आहे.



यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ज्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याला काही कागदपत्रे अर्ज करताना आवश्यक लागणार आहे हे कागदपत्रे बघा खालील प्रमाणे.

लाभार्थ्याचे पॅन कार्ड.

आधार कार्ड.

रहिवासी प्रमाणपत्र.

जातीचे प्रमाणपत्र.




वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. ज्यामध्ये लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असावे.

मोबाईल क्रमांक.

स्टॅम्प पेपर.

शपथ पत्र.

बँक पासबुक झेरॉक्स.

लाभार्थ्याचा ईमेल आयडी आणि छायाचित्रे

वरील ही सर्व कागदपत्रे लाभार्थ्याला अर्ज करताना आवश्यक लागणार आहे.


कोठे करायचा अर्ज

या योजनेचे लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज लाभार्थ्याला ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

या योजने संदर्भात सध्या तरी कुठल्याही प्रकारची ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले नाही.

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण या कार्यालयामध्ये लाभार्थ्याला भेट द्यावी लागणार आहे आणि या ठिकाणी लाभार्थ्याला अर्ज सादर करावा लागणार आहे.


     


  


असेच नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी

आताच आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

📲आपल्या मोबाईल वर मोफत  डिजिटल सेवा अपडेट्स पुरवणारे.

 जनता/ सदगुरू डिजिटल महा ई सेवा केंद्र  ' नक्की जॉईन करा. 

     👉  आमचे पेज जनता डिजिटल ई सेवा केंद्र 

 डिजिटल महा ई सेवा केंद्र सर्व अपडेट्स ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नक्की फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा. 
   


0 Comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.